Tue, Feb 7, 2023

चंद्रकांत पाटलांचा निषेध
चंद्रकांत पाटलांचा निषेध
Published on : 14 December 2022, 12:13 pm
फोटो chd142.jpg
02227
चंदगड ः अव्वल कारकून विलास पाटील यांच्याकडे निवेदन देताना बहुजन विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी.
चंदगडला मंत्री पाटील यांचा निषेध
चंदगड ः मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांच्या कार्याबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल बहुजन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला. बेताल वक्तव्ये करुन वातावरण कलुषित करू नये, अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार विलास पाटील यांनी ते स्वीकारले. राष्ट्रपुरुषांनी हालअपेष्टा सोसून चालवलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे बहुजन समाजातील मुले शिक्षित झाली याचे भान ठेवावे; असा इशारा देण्यात आला. यावेळी रामजी कांबळे, श्रीकांत कांबळे, विक्रम कांबळे, सुरज नाईक, धीरज कांबळे, विशाल कांबळे सहभागी झाले होते.