शयनयान बससेवा सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शयनयान बससेवा सुरु
शयनयान बससेवा सुरु

शयनयान बससेवा सुरु

sakal_logo
By

फोटो chd१४३.jpg
०२२२९
चंदगड ः चालक व वाहकांचा सत्कार करताना शिवाजीराव पाटील, नगरसेवक हळदणकर, शांताराम पाटील, नामदेव पाटील आदी.
----------------------------------------
चंदगड- ठाणे शयनयान बस सुरू
चंदगड ः येथील आगाराने चंदगड-ठाणे मार्गावर शयनयान बस सेवा सुरु केली. त्याचे उद्घाटन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, माजी सभापती शांताराम पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील आदींच्या हस्ते झाले. या सेवेमुळे चंदगडसह गडहिंग्लज, कागल, कोल्हापूर विभागातील प्रवाशांची सोय होणार असल्याचे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी व्हावा. विशेषतः वयोवृध्द, आजारी व्यक्तींसाठी सोयीचा व्हावा या उद्देशाने सुरु केलेल्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ही बस चंदगडहून ठाणेकडे दुपारी साडेतीनला सुटेल तर ठाण्याहून चंदगडकडे सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल. यावेळी नगरसेवक हळदणकर, बाबूराव हळदणकर, रमेश देसाई, लक्ष्मण गावडे, रमेश देसाई उपस्थित होते.