कंपोष्ट खताची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपोष्ट खताची विक्री
कंपोष्ट खताची विक्री

कंपोष्ट खताची विक्री

sakal_logo
By

फोटो chd233.jpg
02255
हलकर्णी ः दौलत- अथर्व कारखान्याच्या कंपोस्ट खताला शेतकऱ्यांकडून मागणी आहे.
--------------------------------
दौलत- अथर्वकडून
कंपोस्ट खताची विक्री
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत- अथर्व कारखान्याकडून कंपोस्ट खताच्या विक्रीला सुरवात झाली. युनीट हेड ए. आर. पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरण झाले. ते म्हणाले, ‘हे खत उच्च प्रतीचे आहे. त्यामुळे रताळे, बटाटे, ऊस, भात पिकांची चांगली वाढ होते. त्यामध्ये एनपीके व ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.’ यावेळी संचालक विजय पाटील, सचिव विजय मराठे, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण, कामगार अधिकारी अश्रू लाड, पर्यावरण अधिकारी संजय सोमदे, सुरक्षा अधिकारी साळोखे उपस्थित होते.