चंदगडला रविवारी मॅरेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला रविवारी मॅरेथॉन
चंदगडला रविवारी मॅरेथॉन

चंदगडला रविवारी मॅरेथॉन

sakal_logo
By

चंदगडला रविवारी मॅरेथॉन
सोमवारी पथनाट्य स्पर्धा; नगरपंचायतीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २९ ः येथील नगरपंचायतीच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (ता. १) मॅरेथॉन स्पर्धा, तर सोमवारी (ता. २) पथनाट्य स्पर्धा होत आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३.० अंतर्गत मंगळवारपासून (ता. २७) विविध स्पर्धांना सुरवात झाली आहे.
मंगळवारी (ता. २७) खुल्या शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा झाल्या. आज खुल्या कबड्डी स्पर्धा झाल्या. शनिवारी (ता. ३१) रांगोळी स्पर्धा होणार आहेत. यासाठी स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा, आपलं चंदगड, सिंगल युज प्लास्टिक, मोबाईलचे दुष्परिणाम, आजचा युवक, लेक वाचवा, आजच्या युगातील शेतकरी हे विषय आहेत. रविवारी (ता. १) सकाळी आठ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी स्पर्धकांना नगरपंचायत कार्यालय ते झांबरे मार्गावर तीन किमी अंतर धावायचे आहे. याच दिवशी चंदगड फेस्टिव्हल होणार आहे. रवळनाथ मंदिराच्या सभागृहात विविध बचत गट व संस्थांकडून स्टॉल मांडण्यात येणार आहेत. सोमवारी (ता. २) पथनाट्य स्पर्धा होईल. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. दुपारी तीन ते पाच या वेळेत सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण होईल. नगरवासीयांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांनी केले आहे.