
बारावीचे वर्ष करिअरसाठी महत्वाचे
02290
हलकर्णी ः बारावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर.
--------------------------------------
बारावीचे वर्ष करिअरसाठी महत्त्वाचे
प्राचार्य डॉ. अजळकर; हलकर्णी महाविद्यालयात विद्यार्थी-पालक मेळावा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३० ः बारावीचे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. तेथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही सजग राहण्याची गरज आहे, असे मत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी व्यक्त केले.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. अजळकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी काळानुसार बदलणारे अभ्यासक्रम निवडायला हवेत. निश्चित ध्येय ठेवून त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करायला हवा. यासाठी पालकांनीही आपल्या मुलातील सुप्त गुण ओळखून अभ्यासक्रम निवडायला मदत करायला हवी.’ संजय पाटील म्हणाले, ‘आपली परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे साधन आहे. ज्याला ज्या विषयामध्ये आवड आहे त्या विषयात पारंगत झाल्यास करिअर घडू शकते.’ प्रा. आर. बी. गावडे, प्रा. एन. के. जावीर, प्रा. नंदू पाटील, पालक प्रतिनिधी संतोष सुतार, तसेच खन्नूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अंकुश नौकुडकर, प्रा. जे. के. पाटील, प्रा. आर. एम. मोरे, प्रा. एस. बी. कांबळे, प्रा. एस. पी. गावडे, प्रा. एस. पी. घोरपडे, प्रा. एस. एस. सुभेदार, प्रा. एस. डी. पाटील, प्रा. डी. जे. भोईटे, प्रा. एन. एम. मोरे, प्रा. आर. एच. काझी, प्रा. एस. व्ही. चिंचणगी उपस्थित होते.
प्रा. सुखदेव शहापूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. जे. एम. उत्तुरे यांनी आभार मानले. प्रा. एच. के. गावडे यांनी सूत्रसंचालन केले.