
खेळाडूंचा सत्कार
फोटो chd53.jpg
02333
हलकर्णी ः यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात यशस्वी खेळाडूंचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. अजळकर, प्रशांत शेंडे व इतर.
------------------------------------------
हलकर्णी महाविद्यालयात खेळाडूंचा सत्कार
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवेलेल्या खेळाडूंचा सत्कार समारंभ झाला. विक्रम पाटील याने कराड येथे झालेल्या स्पर्धेत 97 किलो वजनी गटात ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला सिल्वर मेडल मिळाले. बजरंग बिर्जे याची तामिळनाडू येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत ट्रीपल जंप, लॉंग जंप स्पर्धेसाठी निवड झाली. या दोघांचाही प्राचार्य डॉ. बी.डी. अजळकर, प्रशासकीय प्रमुख प्रशांत शेंडे यांच्या हस्ते सत्कार झाला. ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्रा. के. एम. गोनुगडे, प्रा. एस. डी. तावदारे, डॉ. आय. आर. जरळी, डॉ. आर. ए. घोरपडे, प्रा. जी. जे. गावडे, प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. जे. जे. व्हटकर, जी. जी. नाईक उपस्थित होते. क्रीडा शिक्षक अर्जून पिटूक यांचे मार्गदर्शन लाभले.