भरमू नांगनूरकर निवड

भरमू नांगनूरकर निवड

01457
वडणगे ः येथील शिवपार्वती तलावातील जलपर्णी काढण्याचे सुरू असलेले काम.
....

वडणगेच्या शिवपार्वती तलावाने घेतला
मोकळा श्वास, जलपर्णी काढण्याचे काम सुरू

वडणगे ः जलपर्णीच्या विळख्यात सापडलेल्या वडणगे (ता. करवीर) येथील शिवपार्वती तलावाने आता मोकळा श्‍वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. जवळपास संपूर्ण तलावातील जलपर्णी मनुष्यबळाबरोबरच जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली आहे. येथील तलाव सुमारे तीस एकरांत विस्तारला आहे. सुशोभीकरणाचे काम थांबल्यानंतर या तलावाची दुर्दशा झाली आहे. जलपर्णींचा विळखा पडल्याने या तलावाचे सौंदर्य हरवले आहे. तलावातील जलपर्णी काढून मासेमारी करण्याचा ठेका गेल्या वर्षी देण्यात आला. सुरुवातीला मासेमारी करणाऱ्या‍ ठेकेदाराने तलावातील जलपर्णी काढली. त्यानंतर मात्र ठेकेदाराने दुर्लक्ष केले. सत्तांतर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने तलावातील केंदाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. जेसीबीसह अन्य यंत्रसामुग्री ग्रामपंचायतीने ठेकेदाराला उपलब्ध करून दिली आहे. गेल्या एकोणीस दिवसांपासून जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. काही भाग वगळता संपूर्ण तलावातील जलपर्णी काढण्यात आली आहे.
....
00900
पिलावरवाडी ः येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना ए. वाय. पाटील व इतर.
...
तरुणांनी समाजकार्यातून
राजकारणात यावे ः ए. वाय. पाटील
धामोड ः ‘राजकारणात प्रत्येकवेळी संदर्भ बदलत असतात. तरुणाई हीच देशाची ताकद असून तरुणांनी समाजकार्यातून राजकारणात यावे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ते केळोशी बुद्रुक पैकी पिलारवाडी (ता. राधानगरी) येथे नूतन ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच सविता राहुल पिलावरे होत्या. प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, ‘समाजासाठी वाहून घेणारी माणसे आजकाल कमी होत चालली आहेत; परंतु ग्रामीण भागात ही संख्या बऱ्यापैकी आहे. सामाजिक भान राखून तरुणांनी विधायक कार्य करावे.’ यावेळी तुळशी व धामणी परिसरातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगले, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, अशिनकुमार नवणे, राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना हळदे, सरपंच भारती कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल पिलावरे यांनी केले. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
....
02399
--------

मनसे वाहतूक सेनेच्या
राज्य उपाध्यक्षपदी नांगनूरकर
चंदगड ः आमरोळी (ता. चंदगड) येथील मुंबईस्थित उद्योजक भरमू विठोबा नांगनूरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे. सरचिटणीस आरिफ शेख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. नांगनूरकर हे पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठपणे कार्यरत आहेत. वाहतूक संघटनेचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. या विभागातील विविध ग्रामस्थ मंडळांच्या मुंबईत खोल्या असून त्यांच्या मालकीसंदर्भाचा प्रश्नही त्यांनी उचलून धरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com