‘चंदगड अर्बन’साठी ६५ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चंदगड अर्बन’साठी ६५ टक्के मतदान
‘चंदगड अर्बन’साठी ६५ टक्के मतदान

‘चंदगड अर्बन’साठी ६५ टक्के मतदान

sakal_logo
By

02420
चंदगड ः चंदगड अर्बन बॅंकेसाठी मतदान केंद्रावर मतदानासाठी उपस्थित सभासद.
-------------------------------------
‘चंदगड अर्बन’साठी ६५ टक्के मतदान
आज मतमोजणी; निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १९ ः येथील चंदगड अर्बन बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. तेरा जागांसाठी ६ अपक्षांसह ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सत्तारुढ आघाडी विरोधात परीवर्तन आघाडी यांच्यातच चुरस होती. ९ हजार ११३ मतदारांपैकी ५ हजार ९७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६५.५२ टक्के मतदान झाले. उद्या (ता. २०) श्री देव रवळनाथ मंदिराच्या सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे.
या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दयानंद काणेकर यांची सत्तारुढ आघाडी विरोधात शिवानंद हुंबरवाडी, अली मुल्ला, सचिन बल्लाळ यांची परीवर्तन आघाडी यांच्यात लढत होती. दोन्हीकडून जोरदार प्रचार मोहिम राबवण्यात आली. दरम्यान आज मतदानासाठी चंदगडसह गडहिंग्लज, तुडीये, कोवाड व हलकर्णी या शाखांच्या ठिकाणी सभासदांना मतदानाची सोय केली होती. सर्वाधिक ४ हजार ५७२ मतदार चंदगड शहर आणि परीसरातील गावात होते. त्यापैकी २ हजार ८७९ सभासदांनी मतदान केले. गडहिंग्लज येथे १ हजार ४६७ पैकी ८४१, तुडीये येथे ८३४ पैकी ६१८, कोवाड येथे ८२६ पैकी ५९४ आणि हलकर्णी येथे १ हजार ४०४ पैकी १ हजार ३९ सभासदांनी मतदान केले. दोन्ही आघाड्यांनी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. त्या- त्या शाखांचे मतदान आणण्यासाठी स्वतंत्र टीम तैनात होत्या. जास्तीत जास्त मतदान करुन घेण्याची धडपड दिसून येत होती. दरम्यान उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. रवळनाथ मंदिराच्या सभागृहात ही मतमोजणी होईल. दुपारी बारा वाजे पर्यंत निकाल अपेक्षीत आहे.
--------------------------------------
कोवाडला चुरस
कोवाड : येथील केंद्रावर शांततेत मतदान झाले. ८३४ पैकी ५९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने कोवाड केंद्रावर ७१ टक्के मतदान झाले. परिसरातील सभासद मतदारांनी उत्फूर्तपणे मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. एका एका मतासाठी चुरस दिसून आली. सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी होती. दुपारी मात्र शुकशुकाट होता . सायंकाळी तुरळक स्वरुपात मतदार दिसत होते. केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त होता .