दौलतच्या निवृत्त कामगारांची उद्या बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौलतच्या निवृत्त कामगारांची उद्या बैठक
दौलतच्या निवृत्त कामगारांची उद्या बैठक

दौलतच्या निवृत्त कामगारांची उद्या बैठक

sakal_logo
By

‘दौलत’च्या निवृत्त कामगारांची उद्या बैठक
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्यातून १ सप्टेंबर २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या कामगारांची बैठक शनिवारी (ता. २५) होत आहे. संघटनेचे जे. जी. पाटील, एस. आर. पाटील, एम. एन. पाटील, एस. के. पाटील यांनी ही माहिती दिली. कारखाना साईटवरील श्री गणेश मंदिरात दुपारी बारा वाजता होणाऱ्या बैठकीत वाढीव पेन्शनसंदर्भात अर्ज भरले जाणार आहेत. कामगारांनी येताना पीएफची स्लीप, पीपीओ ऑर्डर, आधार कार्ड, यूएएन नंबर, मोबाईल नंबर आदी माहिती घेऊन यायचे आहे.
--------------------------------------
बीएड कॉलेजचा सांगता समारंभ
चंदगड ः नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय महाविद्यालयात महादेवराव वांद्रे बीएड कॉलेजच्या सावत्रीबाई फुले गट क्रमांक एकच्या पाक्षिक भागाचा सांगता समारंभ झाला. एस. आर. सप्ताळे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य एन. जे. कांबळे, मनोज जांबोटकर, पुंडलिक गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक गावडे, सुरेश कांबळे, जयेंद्र नाईक यांनी संयोजन केले. स्नेहल भोसले यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ पाटील यांनी आभार मानले.