महाआरोग्य शिबिराचा पंधरा हजार रुग्णांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाआरोग्य शिबिराचा पंधरा हजार रुग्णांना लाभ
महाआरोग्य शिबिराचा पंधरा हजार रुग्णांना लाभ

महाआरोग्य शिबिराचा पंधरा हजार रुग्णांना लाभ

sakal_logo
By

02437
इनाम सावर्डे ः येथे भाजपतर्फे झालेल्या महाआरोग्य शिबिराचा सर्वसामान्य रुग्णांनी लाभ घेतला.
--------------------------------------------
महाआरोग्य शिबिराचा पंधरा हजार रुग्णांना लाभ
इनाम सावर्डे येथे आयोजन; पाच हजारांहून अधिक लाभार्थींना चष्म्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ ः इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी दोन दिवसांचे महाआरोग्य शिबिर घेतले. याचा तालुक्यातील सुमारे पंधरा हजार रुग्णांनी लाभ घेतला. विविध आजारांची तपासणी, संदर्भ सेवा, मोफत औषधे दिली. सुमारे पाच हजारांहून अधिक रुग्णांना चष्मे वाटप केले.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. गंभीर आजारी रुग्णांना शासनाच्या विविध योजनांतून पुढील संदर्भ सेवा देण्याबाबत आश्वासित केले. दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत राबवलेल्या शिबिराला गर्दीचा उच्चांक होता. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे, राम राऊत, प्रशांत साळुंखे, कृष्णा लोंढे, गणपती कांबळे, चिराग आनंद, गौरव गुळवणी, अमोल पाटील यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली. उपाध्यक्ष शांताराम पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, रवींद्र बांदिवडेकर, सुनील काणेकर, गणेश फाटक, चंद्रकांत किरमटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
-------------
चंदगडसारख्या दुर्गम तालुक्यात आरोग्यविषयक सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. यापुढील काळात प्रत्येक गावात आरोग्य शिबिर घेण्याचा संकल्प आहे.
- शिवाजीराव पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप