साखर पोत्यांचे पूजन

साखर पोत्यांचे पूजन

फोटो chd२७.jpg
02449
हलकर्णी ः दौलत-अथर्व कारखान्यात साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजी, शिवाजीराव पाटील, भरमूअण्णा पाटील, मानसिंग खोराटे, अशोक जाधव आदी.
--------------------------------

शेवटचे कांडके तुटेपर्यंत कारखाना सुरू
मानसिंग खोराटे; दौलत- अथर्वमध्ये ३ लाख ८१ हजार ३११ साखर पोत्यांचे पूजन

चंदगड, ता. २ ः कार्यक्षेत्रातील उसाचे शेवटचे कांडके तुटेपर्यंत कारखाना सुरु ठेवणार असल्याची ग्वाही दौलत- अथर्व कारखान्याचे मानसिंग खोराटे यांनी दिली. हंगामातील ३ लाख ८१ हजार ३११ व्या साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठाचे गुरुसिध्देश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या हस्ते पूजन झाले. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अशोक जाधव उपस्थित होते.
खोराटे म्हणाले, ‘कारखान्याचे नूतनीकरण व अडथळे पार करीत ४ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला. काही कारखाने बंद झाले. परंतु चंदगड तालुक्यात ऊस शिल्लक आहे. तो पूर्ण तोड होईपर्यंत कारखाना सुरु राहिल. शेतकऱ्यांचा सहकार्याबद्दल ऋणी आहे.’ कारखान्याने शेतकरी, तोडणी- वाहतूक यंत्रणेची बिले वेळेवर दिली आहेत. फेब्रूवारीत उचल उसाची बीलेही लवकरच आदा करू.’ अॅड. संतोष मळवीकर, संजय पाटील, शांताराम पाटील, शिवाजी तुपारे, बाळाराम फडके, विजय पाटील, शिवाजी सावंत, कृष्णराव वाईंगडे, मारुती कुट्रे, प्रदीप पवार, सुरेश गायकवाड यांच्यासह विजय पाटील, विजय मराठे, मनोहर होसूरकर, ए. आर. पाटील, आनंद लाड, दयानंद देवण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com