कलानंदिगडला क वर्ग

कलानंदिगडला क वर्ग

फोटो chd72.jpg
02466
कलानंदीगड ः गडाचे प्रवेशद्वार.
--------------------------------
कलानंदीगडच्या भवानी शंकर
मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा
चंदगड, ता. ७ ः कलानंदीगड (ता. चंदगड) येथील भवानी शंकर मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय झाला. खासदार धनंजय महाडिक, नियोजन समितीचे सदस्य माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
कोकण आणि गोव्याच्या सीमेवरील हा किल्ला अत्यंत देखणा आहे. त्याचा इतिहास फारसा परिचित नसला तरी बांधकामाचे अवशेष प्राचीन महत्त्व विशद करतात. काही वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गडाच्या विकासासाठी कष्ट घेत आहेत. गडावरील ढासळलेली बांधकामे श्रमदानातून पूर्ववत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे सर्व काम लोकसहभागातून असल्यामुळे मर्यादा आहेत. व्यापक कामासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. येथील मंदिराचा ‘क’ वर्गात समावेश झाल्यामुळे ही कामे होण्यासाठी संधी आहे. जिल्हा नियोजन समितीने हा निर्णय घेतल्यामुळे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक कदम, सरपंच अमृत कांबळे यांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com