
हलकर्णी महाविद्यालयात उद्या वक्तृत्व स्पर्धा
हलकर्णी महाविद्यालयात
उद्या वक्तृत्व स्पर्धा
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात गुरुवारी (ता. ९) गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील स्मृती वक्तृत्व स्पर्धा होत आहेत. पाचवी ते दहावी लहान गट आणि अकरावीपासून वरील खुला गटात स्पर्धा होतील. दोन्ही गटांसाठी गुरुवर्य गुरुनाथ पाटील शैक्षणिक दीपस्तंभ हा विषयक सामायिक आहे. त्याशिवाय लहान गटासाठी संताची कामगिरी, बदलते पर्यावरण, मोबाईल संस्कृती आणि आपण, वाचाल तर वाचाल हे विषय आहेत. प्रथम चार क्रमांकाना बक्षिसे आहेत. मोठ्या गटासाठी जागतिकीकरणात हरवलेली नाती, उच्च शिक्षण आणि आव्हाने, सोशल मीडिया आणि तरुणाई, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे विषय आहेत. विजेत्यांना बक्षिसे आहेत. स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले आहे.