चंदगड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी 
दयानंद काणेकर, हळदणकर उपाध्यक्ष

चंदगड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दयानंद काणेकर, हळदणकर उपाध्यक्ष

87754
दयानंद काणेकर, बाबू हळदणकर

चंदगड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी
दयानंद काणेकर, हळदणकर उपाध्यक्ष
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ८ : येथील चंदगड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दयानंद काणेकर व उपाध्यक्षपदी बाबू बाळा हळदणकर यांची निवड करण्यात आली. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमकुमार राठोडअध्यक्षस्थानी होते.
बँकेची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. यामध्ये सत्तारूढ दयानंद काणेकर गटाला तेरा पैकी अकरा जागा मिळाल्या. विरोधी गटातून केवळ दोन संचालक निवडून आले. दरम्यान आज पदाधिकारी निवड करण्यात आली. यामध्ये काणेकर व हळदणकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची दखल घेऊन या पदावर पुन्हा त्यांनाच संधी देण्यात आली. सभासदांनी आमच्यावर जो विश्‍वास दाखवला त्याला पात्र राहून या पुढील काळात सुद्धा बँकेच्या प्रगतीच्या दिशेने पारदर्शी कारभार करू अशी ग्वाही काणेकर व हळदणकर यांनी दिली. यावेळी संचालक अरुण पिळणकर, अरुण गवळी, राजेंद्र परीट, सुनील काणेकर, संतोष वणकुंद्रे, फिरोज मुल्ला, प्रमोद कांबळे, सचिन बल्लाळ, सुरेश सातवणेकर, माधवी मुळीक, अर्चना ढेरे उपस्थित होते. सीईओ अरुण चौगुले, नौशाद मुल्ला उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com