दौलत अथर्वची बिले जमा

दौलत अथर्वची बिले जमा

फोटो chd११४.jpg
02490
मानसिंग खोराटे
-------------------------------------
‘दौलत-अथर्व’ची
ऊस बिले जमा

मानसिंग खोराटे; ४ लाख ४ हजार १३० टन गाळप

चंदगड, ता. ११ ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व कारखान्याची १५ फेब्रुवारीअखेरपर्यंत गाळपाला आलेल्या उसाची बिले संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहे. कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी ही माहिती दिली. १५ फेब्रुवारीअखेर एकूण ३ लाख ५२ हजार ८१५ टन तर हंगामात आजअखेर ४ लाख ४ हजार १३० टन उसाचे गाळप झाल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा पाच लाख टनाचे उद्दिष्ट होते. सुरवातीचे काही दिवस कारखाना वेळेत सुरु न झाल्याने मर्यादा आली. तरीही शेतकऱ्यांचा विश्वास, कामगार, तोडणी, वाहतूक यंत्रणेने प्रामाणिक काम करुन उद्दिष्टाच्या दिशेने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. १ ते १५ फेब्रुवारीअखेर गाळप उसाचे प्रतिटन ३ हजार १ रुपयांप्रमाणे १५ कोटी ९५ लाख १ हजार ३९२ रु. जमा केले. यंदा आजअखेर ११५ दिवस कारखाना चालला. एकूण ४ लाख ४ हजार १३० टन गाळप झाले. आजअखेर गाळप १०५ कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. संचालक विजय पाटील, युनिट हेड ए. आर. पाटील, सचिव विजय मराठे, पीआरओ दयानंद देवण, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com