Sun, May 28, 2023

चंदगड तालुका नाभिक महिला आघाडी अध्यक्षपदी सुनीता शिंदे
चंदगड तालुका नाभिक महिला आघाडी अध्यक्षपदी सुनीता शिंदे
Published on : 15 March 2023, 4:31 am
सुनीता शिंदेंची अध्यक्षपदी निवड
चंदगड : चंदगड तालुका नाभिक समाज महिला आघाडी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुनीता शिंदे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी दीपाली शिरगावकर यांची निवड करण्यात आली. प्रतीक्षा यादव यांची सचिवपदी निवड झाली. मनीषा शिवनगेकर, गीता बामणे, शोभा नावलगी, अर्चना शिवनगेकर यांची संचालकपदी निवड झाली. चंदगड तालुका नाभिक समाज संघटना, संत सेना महाराज नाभिक पतसंस्था, चंदगड तालुका सलून दुकान मालक संघटना व चंदगड शहर नाभिक संघटना या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.