चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

समर्थ कुंभारचे तलवारबाजीत यश
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ कुंभार याने राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीमध्ये यश संपादन केले. याच स्पर्धेत फेन्सिंग प्रकारात त्याने वैयक्तिक व सांघिक कांस्यपदकही पटकावले. नांदेड येथे झालेल्या या स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात त्याने सहभाग घेतला होता. त्याला क्रीडाशिक्षक अर्जुन पिटूक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी.डी. अजळकर, प्रशासकीय प्रमुख प्रशांत शेंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
-----------------
सातेरीदेवी दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध
चंदगड : मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील श्री सातेरीदेवी महिला सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निकिता मुळीक, सुरेशा फाटक, शारदा मुळीक, वर्षा मुळीक, लक्ष्मी कंग्राळकर, जयश्री वाके, लता सूर्यवंशी, आशा सुंडकर यांचा संचालक मंडळात समावेश झाला. गुरव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थापक अंकुश मुळीक, सचिव पंडलिक मुळीक, नारायण भोगण, दिलीप सुंडकर, कृष्णा सूर्यवंशी, बाळू वाके यांच्यासह सभासद उपस्थित होते.
-----------------
पुरुषोत्तम मातोंडकर यांचा सत्कार
चंदगड : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे हलकर्णी (ता. चंदगड) येथील शाखाधिकारी पुरुषोत्तम मातोंडकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल १९८५ च्या दहावीच्या बॅचच्या वर्गमित्रांनी त्यांचा सत्कार केला. प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष दयानंद पाटील, नागोजी भोसले, बाबूराव वरपे यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या वर्गमित्राला जिल्हास्तरीय संस्थेवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com