उपद्रवी वानरांना पकडणार

उपद्रवी वानरांना पकडणार

02504
श्रीपादवाडी, नागवे परिसरात
वानरे पकडण्यासाठी मोहीम
उपवनसंरक्षक गुरुप्रसाद; जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे निवेदन
चंदगड, ता. १३ ः तालुक्याच्या पश्चिम भागात श्रीपादवाडी, नागवे, इनाम कोळींद्रे परीसरातील वानरांना पकडण्यासाठी मोहीम राबवण्याचे आश्वासन उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांनी दिले. यासंदर्भात आज ‘सकाळ’मध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल घेऊन शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी आश्वासन दिले.
श्रीपादवाडी परिसरात वानरांच्या कळपाकडून परसातील पिके, फळझाडे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. त्यांना हुसकवायला गेल्यास ते अंगावर येत असल्याने नागरिकांत भीती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून केले जाणारे नुकसान निमूटपणे बघत बसण्याची वेळ आली आहे. या वानरांचा वन विभागाने बंदोबस्त करावा; अशी मागणी रमेश सामंत यांच्यासह नागरिकांनी केली. यासंदर्भात ‘सकाळ’मधील वृत्ताची दखल घेऊन देवणेंनी उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांची भेट घेतली. त्यांनही वानरांच्या बंदोबस्ताची मागणी केली. त्यावर त्यांनी वानरांना पकडून आंबोलीच्या जंगलात सोडण्याचे आश्वासन दिले. दोन-तीन दिवसात ही मोहीम राबवली जाईल; असे गुरुप्रसाद यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com