चंदगड नगरपंचायतीकडून दिव्यांग निधीचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड नगरपंचायतीकडून 
दिव्यांग निधीचे वाटप
चंदगड नगरपंचायतीकडून दिव्यांग निधीचे वाटप

चंदगड नगरपंचायतीकडून दिव्यांग निधीचे वाटप

sakal_logo
By

02508
चंदगड ः दिव्यांग निधीचे वाटप करताना नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व इतर नगरसेवक.

चंदगड नगरपंचायतीकडून
दिव्यांग निधीचे वाटप
चंदगड ः येथील नगरपंचायतीकडून सन २०२२-२३ चा दिव्यांग निधी संबंधित लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते दोन लाख ८९ हजार रुपयांचा निधी धनादेशद्वारे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आला. चाळीस, साठ, शंभर टक्के व्यंगत्वानुसार लाभार्थ्यांना रक्कम वाटण्यात आली. लाभार्थी शरद मुळीक, प्रदीप बल्लाळ, दिलबर मुल्ला, सुशांत उसुरकर, राजाराम देसाई, बाबूराव गुळामकर, बाळू रजपूत, विष्णू कुंभार, नंदकिशोर पिळणकर, साक्षी बागल यांनी धनादेश स्वीकारले. या वेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेविका नेत्रदीपा कांबळे, अनिता परीट, संजना कोकरेकर, नूरजहॉ नाईकवाडी, सचिन नेसरीकर, शिवानंद हुंबरवाडी यांच्यासह मुख्याधिकारी स्वरुप खारगे, प्रशासकीय अधिकारी आशुतोष प्रधान, लेखापरीक्षक दत्तात्रय टोपे, लिपिक अनंत चंदगडकर उपस्थित होते. प्रीती बल्लाळ यांनी आभार मानले.