टु ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु ४
टु ४

टु ४

sakal_logo
By

02512
लकीकट्टेत गुणवंतांचा सत्कार
चंदगड ः लकीकट्टे (ता. चंदगड) येथील श्रमिक सेवा फाऊंडेशन व दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार झाला. एशियन बॅंकेचे सल्लागार डॉ. परशराम पाटील प्रमुख पाहूणे होते. सरपंच संजीवनी पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
पोलीस पाटील दयानंद कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेले कर्मचारी, सीमेवर सेवा बजावणारे सैनिक, प्रगतशील शेतकरी, आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, उद्योजक यांचा सत्कार झाला. स्वातंत्र्यसैनिक अनंतराव कुलकर्णी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. डॉ. पाटील यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘शेतकरी अन्नदाता आहे. त्यांचे जीवन सुसह्य होण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचे ज्ञान आत्मसात करुन जे विकते ते पिकवण्याचा प्रयत्न करावा.’ संजय पाटील शिवणगे, प्रा. ए. डी. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल कांबळे, चाळोबा कांबळे, गणेश कांबळे, विलास कांबळे, धोंडीबा मासेवाडकर यांनी संयोजन केले. प्रकाश सुतार यांनी आभार मानले.