हेरे सरंजाम आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेरे सरंजाम आवाहन
हेरे सरंजाम आवाहन

हेरे सरंजाम आवाहन

sakal_logo
By

हेरे सरंजामप्रश्नी विहीत नमुन्यातील
अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंदगड ः हेरे सरंजाम अंतर्गत जमिनी कसणाऱ्या कुळांना त्यांचा मालकी हक्क देण्यासाठी महसूल प्रशासनाकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. त्यासाठीची बयाना रक्कम स्वामी प्रतिष्ठान भरणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज येथील भाजप कार्यालयात जमा करावेत. पुढील कार्यवाही प्रतिष्ठानतर्फे केली जाईल, असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी केले आहे. तालुक्यातील ४७ गावांचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्याकामी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी जमिनीच्या आकाराच्या दोनशे पट रक्कम भरण्याचा मुद्दा चर्चेत आला. ही रक्कम स्वामी प्रतिष्ठानतर्फे भरली जाईल, असे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून पुढील नियोजन राबवण्यात येत आहे. जमीन नावावर करण्यासंदर्भात कुळांनी विहीत नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे. त्याचा नमुना तलाठी कार्यालयात उपलब्ध आहे. विहीत नमुन्यातील अर्ज भरुन ते भाजपच्या येथील कार्यालयात जमा करावेत. कोणालाही शासन दरबारी हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असे आश्वासनही पाटील यांनी दिले आहे.
.....
करड्याळमधील हनुमान सेवा संस्थेत
मुश्रीफ गटाची बाजी

सेनापती कापशी : करड्याळ (ता. कागल) येथील हनुमान विकास सेवा संस्थेच्या सहा महिन्यात नव्याने झालेल्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने सर्व जागा जिंकून विरोधी समरजित घाटगे, मंडलिक व संजय घाटगे गटाचा धुव्वा उडविला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धनंजय पाटील यांनी काम पाहिले. सहा महिन्यांपूर्वी या संस्थेची निवडणूक झाली होती. त्यामध्ये या परस्पर विरोधी आघाड्यांचे प्रत्येकी सहा उमेदवार निवडून आले. त्यानंतर अध्यक्षपदावर दोन्ही बाजूने दावा केला गेला. त्याचा तिढा सुटला नाही. यामुळे संस्थेवर प्रशासक येण्याची नामुष्की ओढवली. सहा महिन्यानंतर आता पुन्हा निवडणूक झाली. यामध्ये मुश्रीफ गटाने यश मिळविले. त्यांचे सर्व बारा उमेदवार निवडून आले. विजयी झालेले मुश्रीफ गटाचे उमेदवार असेः यशवंत गेंगे, आप्पासो जाधव, रमेश दळवी, ॲड. अरुण पाटील, विनोद पाटील, जीवन फेगडे, आण्णासो वाणी, शिवानंद वाणी, बेबीताई कांबळे, रेखा बिरंजे, आनंदा कुंभार, मनोहर कांबळे.