
दूरगामी दृष्टीकोनातूनच आधुनिक महाराष्ट्र
02547
हलकर्णी ः यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. प्रकाश पवार यांनी मार्गदर्शन केले. संजय पाटील, विशाल पाटील आदी उपस्थित होते.
----------------------------------------
दूरगामी दृष्टीकोनातूनच आधुनिक महाराष्ट्र
डॉ. प्रकाश पवार यांचे मत, हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय परीसंवाद
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ ः आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दूरगामी दृष्टीकोन महत्वाचा होता. बहुजन समाज डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राज्यात अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. त्याची फळे आजचा समाज चाखत आहे, असे मत डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या विषयावर राष्ट्रीय परीसंवादात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. पवार म्हणाले, ‘महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन चव्हाणांनी काम केले. विज्ञानाचा अंगीकार करुन समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी परीश्रम घेतले.’ दुसऱ्या सत्रात डॉ. अरुण भोसले तर तिसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण यांनी यशवंतरावांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्यातील उच्च गुणवत्तामूल्यांचे विवेचन केले. संवेदनशीलता, सुसंस्कार आणि माणुसकी यातून घडलेले त्यांचे नेतृत्व आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. डॉ. मीना मोहिते बेळगाव यांनी निबंध वाचन केले. संस्थेचे सचिव विशाल पाटील, डॉ. चंद्रवर्धन नाईक, डॉ. अनिल गवळी, डॉ. राजेश घोरपडे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जे. जे. व्हटकर यांनी पाहुण्यांचा परीचय करुन दिला. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. जी. कांबळे यांनी आभार मानले.