
माडखोलकर’मध्ये भित्तीपत्रकाचे अनावरण
02549
चंदगड ः र. भा. माडखोलकर महाविद्यालयात भित्तीपत्रकाच्या अनावरणप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.
---------------------------------------
‘माडखोलकर’मध्ये भित्तीपत्रकाचे अनावरण
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे ‘वेध उद्योजकतेचा’ या विषयावरील भित्तीपत्रिकेचे अनावरण केले. ग्रामीण पर्यटन, ब्युटीपार्लर, रेशीम उद्योग, फणस व बटाटे प्रक्रिया, पर्यावरणपूरक व्यवसाय याचा यामध्ये समावेश आहे. भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा जवळून अभ्यास व्हावा हा हेतू असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आपल्या परीसरातील नवनवीन उद्योग, व्यवसायांचा अभ्यास करायला हवा. त्यातून प्रेरणा घेऊन स्वतः उद्योजक होण्याचे स्वप्न बघायला हवे.’ प्रा. एस. के. सावंत, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. व्ही. के. गावडे उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रंचालन केले. प्रा. पी. सी. देशपांडे यांनी आभार मानले.