
अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग
अल्पवयीन विद्यार्थीनीचा वियनभंग; एकावर गुन्हा
चंदगड ः तालुक्यातील एका शाळेमध्ये प्रज्ञाशोध परीक्षेचा पेपर देऊन भाडोत्री मोटारीतून परत गावी येणाऱ्या विद्यार्थीनीचा मोटार चालकाने विनयभंग केला. सोमवारी (ता. 27)हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित मोटार चालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गावातील विद्यार्थ्यांना शेजारच्या गावातील परीक्षा केंद्रावर ने- आण करण्यासाठी शिक्षकांनी एक खासगी मोटार ठरवली होती. त्यातून हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गेले. पेपर देऊन परत येत असताना मोटार चालकाने या मुलीला जवळ बसवून घेऊन लज्जास्पद वर्तन केले. विद्यार्थीनीने घरी येऊन आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबात चर्चा होऊन संबंधित संशयितावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पिडीत विद्यार्थीनीच्या आईने आज येथे पोलिसात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्ष कारंडे तपास करीत आहेत.