पोलीस वृत्त

पोलीस वृत्त

पाटणे फाटा, मजरे कार्वेत
मटका अड्यावर छापे

चंदगड ः तालुक्यातील पाटणे फाटा व मजरे कार्वे येथे पोलिसांनी मटका अड्यावर छापे टाकून संशयित मटका चालकांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडील रोख रक्कम व मुद्देमाल जप्त केला. पाटणे फाटा येथे एका किराणा स्टोअर्सच्या बाजूला उघड्या जागेत अंधारात संशयित शिवाजी यलाप्पा नाईक (रा. नाईकवाडा, हलकर्णी) व संजय लक्ष्मण नाईक (रा. हलकर्णी) हे मटका अड्डा चालवत होते. त्यांच्याकडे रोख रक्कम व इतर साहित्य मिळून 5 हजार 733 रुपये पोलिसांनी जप्त केले. बुकी मालक भुजंग मसणू नाईक यांच्यासाठी ते मटका घेत होते. दरम्यान मजरे कारवे (ता. चंदगड) येथील एका हॉटेलच्या मागील बाजूच्या बोळात संशयित संजय नाईक हा स्वतःच्या तसेच बुकी मालक गजानन गावडे (रा. नागनवाडी) याच्या फायद्याकरीता मटका घेत असताना आढळला. त्याच्याकडे रोख रक्कम व इतर साहित्य मिळून 5 हजार 433 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com