काजू पीक परिसंवाद

काजू पीक परिसंवाद

फोटो  chd203.jpg
02645
दाटे : काजू पीक परिसंवादात मार्गदर्शन करताना नवीन पुट्टास्वामी. शेजारी मान्यवर.
---------------------------------------
काजू पिकाचे शास्त्रीय व्यवस्थापन हवे
नवीन पुट्टास्वामी; दाटेत जिल्हास्तरीय काजू परिसंवाद

चंदगड, ता. २० : काजू शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे मत
कणबर्गी  (जि. बेळगाव) येथील एचआरइसीचे प्रमुख नवीन पुट्टास्वामी यांनी व्यक्त केले. दाटे (ता. चंदगड ) येथे जिल्हास्तरीय काजू पीक परिसंवाद कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी व कोको अनुसंधान केंद्र भारत सरकार व बळीराजा काजूदर संघर्ष समिती यांच्या वतीने परिसंवाद आयोजित केला होता. वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्र कणेरीचे प्रमुख रवींद्र सिंह यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नवीन पुट्टास्वामी यांनी काजू मोहर व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन व काजू प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पराग तुरखडे यांनी काजूवरील कीड रोगाविषयी मार्गदर्शन केले. धन्वंतरी देसाई यांनी शासनाच्या  काजू उद्योग व योजनांची माहिती दिली. कृषी उपसंचालक रवींद्र पाठक यांनीही मार्गदर्शन केले. बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी चंदगड-आजरा व सीमाभागातील काजूचे क्षेत्र व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. शासनाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत मांडेदुर्ग, ढोलगरवाडी व दाटे यांचे सहकार्य लाभले. सहायक शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग काळे यांनी आभार मानले. राजेंद्र वावरे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा पाटील, निवृत्ती मसुरकर, बंडू पाटील, एम. के. पाटील, विठ्ठल गावडे, दयानंद भादवणकर, बापू होडगे, उत्तम मुरकुटे यांच्यासह चंदगड, आजरा व गडहिंग्लज भागातील काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com