दोन पुस्तकांचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन पुस्तकांचे प्रकाशन
दोन पुस्तकांचे प्रकाशन

दोन पुस्तकांचे प्रकाशन

sakal_logo
By

दोन पुस्तकांचे
चंदगडला प्रकाशन

चंदगड, ता. २३ ः येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये `बाबांना समजून घेताना` व `शाळा, विद्यार्थी आणि मी` या दोन पुस्तकांचे प्रकाशन लेखिका माधुरी शानभाग यांच्या हस्ते झाले. प्राचार्य एन. डी. देवळे अध्यक्षस्थानी होते. पुस्तकांचे संपादक संजय साबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या स्वानुभव लेखनातून ही पुस्तके तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. शानभाग म्हणाल्या, ``शालेय जीवनात विद्यार्थ्यांना लिखानाची संधी दिली तर पुढील जीवनात नक्की ते यशस्वी होतात. यातून चांगले साहित्यिक घडण्याची प्रक्रीया होते.`` प्राचार्य देवळे म्हणाले, ``विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना स्पष्ट करुन दिल्यावर त्यांच्याकडून चांगली कृती घडते याचे उदाहरण म्हणून या पुस्तकांकडे पाहता येईल.`` डॉ. एस. पी. बांदिवडेकर, डॉ. पी. आर. पाटील, अॅड. आर. पी. बांदिवडेकर, विद्या बांदिवडेकर, एस. आर. देशमुख, अॅड. अजित कडूकर, महेश माने उपस्थित होते.