
बौध्दीक संपदेने सामाजिक विकासाला चालना
02663
हलकर्णी ः बौध्दीक संपदा शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. शिवाजी सादळे. शेजारी प्राचार्य डॉ. अजळकर, प्रा. पी. ए. पाटील.
-------------------------------------
बौध्दीक संपदेने सामाजिक विकासाला चालना
डॉ. शिवाजी सादळे; हलकर्णी महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २३ ः सध्याच्या युगात संकल्पनेला अनन्यसाधारण महत्व आहे. बौध्दीक संपदेचाच हा एक अविष्कार आहे. बौध्दीक संपदा व्यक्ती व समाजाच्या विकासाला चालना देते, असे मत शिवाजी विद्यापीठातील बौध्दीक संपदा विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी सादळे यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बौध्दीक संपदा शिबिरात ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. सादळे म्हणाले, ‘तंत्रज्ञान वेगवेगळ्या रुपात विकसित होत आहे. आपल्या डोक्यातील विचार किंवा संकल्पना विविध रुपात व्यक्त करता आली तर त्याचा स्वतःसह समाजाला उपयोग होतो.’ प्राचार्य डॉ. अजळकर यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील संकल्पनांना वाव निर्माण करुन द्यायला हवा. त्याची मांडणी करण्याचे कसब शिकायला हवे असे मत त्यांनी मांडले. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेश घोरपडे यांनी पाहुण्यांचा परीचय करुन दिला. डॉ. जे. जे. व्हटकर आदी उपस्थित होते. प्रा. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. ए.पाटील यांनी आभार मानले.