सामाजिक सुरक्षितेत उत्साळी प्रथम

सामाजिक सुरक्षितेत उत्साळी प्रथम

02665
दिल्ली ः केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपील पाटील, सचिव सुनील कुमार यांच्या हस्ते सरपंच माधुरी भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला.
----------------------------------------
सामाजिक सुरक्षितेत उत्साळी प्रथम
दिल्ली येथे गौरव; केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राजकडून प्रशस्तीपत्र
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २३ ः उत्साळी (ता. चंदगड) गावाने सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव या विभागात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. दिल्ली येथे केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाकडून ग्रामपंचायतीला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. पंचायत राज विभागाचे सचिव संतोष कुमार यांच्या हस्ते सरपंच माधुरी भोसले, ग्रामसेवक यांनी सत्कार स्वीकारला.
१७ ते २१ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा केला. या अंतर्गत पुरस्कार समारंभही झाला. संयुक्त राष्ट्र संघाने ठरवून दिलेल्या सतत विकासाच्या मानांकनानुसार सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव या सातव्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट गावामध्ये उत्साळीचा राज्यात प्रथम क्रमांक बसला. या ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरण व बाल विकासवर विशेष भर दिला होता. अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांच्या मदतीने लसीकरण, आरोग्य तपासणी, लैंगिक शिक्षण, पोषण आहार आदी उपक्रम राबवले. वंचित घटकांच्या मनातील न्यूनगंड दूर करुन सन्मानाने जगण्यासाठी बळ दिले. विधवा महिलेच्या हस्ते ध्वजवंदन केले. दहावी, बारावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्याहस्ते ध्वजवंदन हा नवीन उपक्रम राबवला. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री भगतसिंग कुलस्ते, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपील पाटील, सचिव सुनील कुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यशदाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, विस्तार अधिकारी ठोंबरे, कांबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com