
मिरणुकीने शिवजयंतीची सांगता
फोटो chd261.jpg
02680
चंदगड ः शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांचा सत्कार करताना पोलिस निरीक्षक संतोष घोळवे.
------------------------------------
चंदगडला भव्य मिरवणुकीने शिवजयंतीची सांगता
चंदगड, ता. २६ ः हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून लढलेल्या लढाईतील एकेक प्रसंग जिवंत होत गेला आणि उपस्थितांच्या अंगावर अभिमान आणि गर्वाचे रोमांच उभे राहिले. येथे संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवारी (ता. २५) सायंकाळी भव्य मिरवणुकीने उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी शिवकालीन प्रसंगावरील पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
शिवजयंतीनिमित्त शहरात पाच दिवस विविध उपक्रम राबवण्यात आले. शुक्रवारी (ता. २१) शहरातून शिवजागर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज दुचाकीवर लावून शेकडो शिवभक्त सहभागी झाले. गल्लीगल्लीतून भगव्या लाटेबरोबर छत्रपतींच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले. राजहंसगड (कर्नाटक) येथून शिवज्योत आणण्यात आली. शनिवारी (ता. २२) पहाटे महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. पाळणा म्हणून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. रात्री दिवट्या नाचवून गोंधळ घालण्यात आला. शहरातील अनेक मान्यवरांसह आबालवृध्दांनी सहभाग घेतला. मंगळवारी (ता. २५) भव्य शोभायात्रेने उत्सवाची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊमाता, छत्रपती संभाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेषामध्ये अनेक शिवभक्त सहभागी झाले होते. यात्रेत शिवकालीन विविध प्रसंगांवर आधारित पथनाट्ये सादर झाली. प्रतापगडावरील शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा प्रसंग नेटकेपणाने सादर करण्यात आला.
---------------------------------------