
पाक कला कार्यशाळा
फोटो chd262.jpg
02682
हलकर्णी ः पाककला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शीतल पाटील.
--------
हलकर्णी महाविद्यालयात पाककला कार्यशाळा
चंदगड, ता. २६ ः योग्य निरीक्षण, नियोजन आणि संयम यातून उत्तम पाककला अवगत होते, असे मत शीतल विशाल पाटील यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पाककला कार्यशाळा झाली. त्यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील सचेतना मंडळामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. जी. ए. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. आर. एच. काझी यांनी प्रास्ताविक केले. शीतल पाटील म्हणाल्या, ‘आई, आजीकडून आपणाला स्वयंपाकाचे कृतीशील ज्ञान मिळते. वेळोवेळी स्वतःचे निरीक्षण, अनुभव यातून त्यामध्ये पारंगत होता येते.’ प्रा. शाहीन मुजावर, प्रा. अश्वीनी राठोड, माधुरी पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अजळकर म्हणाले, ‘उत्तम पदार्थ तयार करता येणे हा आत्मविश्वासाच भाग आहे. त्यातून स्वतःबरोबर इतरांनाही आनंद देता येतो.’ माया पाटील, डॉ. जे. पी. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या. माधुरी सुतार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जे. एम. उत्तुरे यांनी आभार मानले.