
पुस्तक दिन साजरा
फोटो chd266.jpg
02689
चंदगड ः माडखोलकर महाविद्यालयात व्याख्यान देताना प्रा. बळीराम सावंत. शेजारी एस. बी. दिवेकर, मायाप्पा पाटील व इतर मान्यवर.
-------------------------------------------------------------------
शेक्सपीअरचे साहित्य प्रतिभेची साक्ष देते
प्रा. सावंत; माडखोलकर महाविद्यालयात पुस्तक दिन
चंदगड, ता. २६ ः विल्यम शेक्सपीअर इंग्लंडचा राष्ट्रकवी असला तरी त्याने प्रतिभेने जगात रसिक निर्माण केले. त्याने लिहिलेल्या सुखात्मिका, शोकात्मिका, काव्य, सुनीते हे सगळेच वाड्मय त्याच्या प्रतिभेची साक्ष देते, असे मत प्रा. बळीराम सावंत यांनी व्यक्त केले. येथे र. भा. माडखोलकर महाविद्यालयात पुस्तक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.
प्रा. सावंत म्हणाले, ‘शेक्सपीअरने साहित्यातून २४ हजार नवीन शब्दांना जन्म दिला. विविध पात्रांचे स्वभाव रेखाटताना त्यांची मानसिकता शब्दबध्द केली. त्याच्या सर्वच साहित्यिक कृतींचा अभ्यास मानवी मनाला नवीन दृष्टी देणारा आहे. त्यासाठी त्याच्या प्रत्येक साहित्यकृतीचा अभ्यास महत्वाचा आहे.’’ प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘शेक्सपीअरचा जन्मदिवस जगभरात पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याने प्रतिभेतून साहित्य विश्वाला विस्तृत केले. त्याने निर्माण केलेली साहित्यकृती मानव समाजासाठी देणगी आहे.`` इंग्रजी विभागप्रमुख प्रा. एस. बी. दिवेकर यांनी प्रस्ताविक केले. डॉ. एन. के. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. आर. के. तेलगोटे, डॉ. डी. ए. मोरे, मायाप्पा पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. दिव्या फाटक यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.