संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

माडखोलकर महाविद्यालयात शनिवारी नोकर भरती मेळावा
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात शनिवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता आयसीआयसीआय बॅंकेत रिलेशनशीप मॅनेजर पदासाठी भरती मेळावा होत आहे. महाविद्यालयातील करीअर गायडन्स व प्लेसमेंट विभागाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. वयोमर्यादा १९ ते २५ आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण असावेत. वार्षिक पगार २ लाख ७० हजार ते ३ लाख २० हजार इतका असेल. इच्छुकांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या मुळ कागदपत्रे व सत्यप्रतीसह उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व डॉ. आर. एन. साळुंखे यांनी केले आहे.
--------------------------------------------------------------------------------------
चंदगडला रविवारी संयुक्त जयंती महोत्सव
चंदगड ः भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तालुकास्तरीय संयुक्त जयंती सोहळा रविवारी (ता. ३०) होत आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला विद्रोही साहित्यिक पार्थ पोळके प्रमुख वक्ते आहेत. सकाळी साडे नऊ वाजता त्रीशरण व पंचशील ध्वजारोहण, दहा वाजता चित्ररथ व प्रभात फेरी, दुपारी १२ ते २ या वेळेत स्वागत समारंभ व व्याख्यान होईल. येथील पंचायत समितीच्या पटांगणात विविध खात्याचे शासकीय अधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------
चैत्रपालवी काव्यसंग्रहाचे प्रकाशन
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील विद्यार्थीनी चैत्राली सुतार हिने लिहिलेल्या चैत्रपालवी काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, सटुप्पा फडके यांनी सुतार यांच्या कवितेचा आशय सांगितला. यापुढील काळातही तीने दर्जेदार साहित्य निर्मिती करावी अशा शुभेच्छा दिल्या. पंकज पाटील, संतोष नेवगे, तुकारामपाटील, प्रकाश वाईंगडे, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रभाकर सुतार, मारुती नाईक, महादेव सुतार, राखी सुतार उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय कांबळे यांनी आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------------
सुनील कोंडुसकर......चंदगड.....
ता. २६-४-२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com