
नरसिंगराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासूया
02713
म्हाळेवाडी : माजी आमदार कै नरसिंगराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
------------------------------------------
नरसिंगराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासूया
आमदार राजेश पाटील; म्हाळेवाडी येथे कै. पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ४ : माजी आमदार (कै.) नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांनी शेती सहकार उद्योग राजकारण या सर्वच क्षेत्रात आदर्श घालून दिले आहेत. त्यांच्या विचारांची जोपासणूक करूया असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले. कै. पाटील यांच्या जयंतीनिमित्त म्हाळेवाडी ( ता. चंदगड ) येथे प्रतिमा पूजन केले. त्यावेळी ते बोलत होते.
सुस्मिता पाटील, निखिल पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. तालुका खरेदी विक्री संघामार्फत सभासदांना स्मार्ट कार्डचे वितरण केले. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार केला. रामाप्पा करिगार, अशोक पाटील, अश्विनी पाटील यांची भाषणे झाली. पोमानी पाटील, संचालक तानाजी गडकरी, परसु पाटील, बाळू चौगुले, अभय देसाई आदी उपस्थित होते. सरपंच चाळोबा पाटील यांनी प्रास्ताविक केले.