
गोवा बनावटीची दारू पकडली
02715
नांदवडे : राज्य उत्पादन शुल्कच्या गडहिंग्लज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून पकडलेली गोवा बनावटीची दारू.
-----
नांदवडे येथे गोवा बनावटीची दारू पकडली
चंदगड : नांदवडे (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीची एक लाख ५५ हजार ४० रुपयांची दारू पकडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात जागोजागी नाकाबंदी सुरू आहे. नांदवडे येथे गोवा बनावटीच्या दारूचा साठा केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार गडहिंग्लज विभागाचे एम. एस. गरुड, किरण पाटील, एल. एन. पाटील, एस. आर. ठोंबरे, बी. ए. सावंत, जी. एस. जाधव, एस. बी. चौगुले, ए. टी. थोरात, मुकेश माळगे यांनी सापळा रचून छापा टाकला. संशयित आरोपी परशराम गोपाळ मळवीकर (वय ३२) याच्याकडे गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या दारूचे २७ बॉक्स आढळले.