
हस्ताक्षर स्पर्धा निकाल
फोटो chd52.jpg
02723
चंदगड ः विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना सदानंद पाटील. शेजारी इतर मान्यवर.
हस्ताक्षर स्पर्धेत अमृता पाटील, दर्शिका भैरी प्रथम
चंदगड ः चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे घेतलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत लहान गटात अमृता पाटील तर मोठ्या गटात दर्शिका भैरी यांनी प्रथम क्रमांक पटकावले. स्पर्धेत ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बक्षीस वितरण झाले. प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सदानंद पाटील प्रमुख पाहूणे होते. संजय गोंडाळकर अध्यक्षस्थानी होते. एम. एन. शिवणगेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांसाठी आठ दिवसांचे हस्ताक्षर शिबिर झाले. लहान गटात शरण्य पाटील, आकाश पाटील, स्वराली पाटील तर मोठ्या गटात जान्हवी पाटील, स्वरांजली पाटील, राजलक्ष्मी जौगुले यांनी अनुक्रमे द्वितीय ते चतुर्थ क्रमांक पटकावले. मनोहर नाईक, सुहास गाडीवडर, राजेंद्र शिवणगेकर यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. बी. एन. पाटील, शाहू पाटील, राजेश घोरपडे, महेश जांबोटकर, अशोक पाटील, संतोष पवार उपस्थित होते. एच. आर. पाऊसकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय साबळे यांनी आभार मानले.
संत तुकाराम वस्तीगृहात मोफत प्रवेश
चंदगड ः खेडूत शिक्षण मंडळाच्या मजरे कारवे (ता. चंदगड) येथील संत तुकाराम वसतीगृहात २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश सुरु आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतीगृह अधिक्षक जयसिंग देसाई यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.