
संवाद घडवण्यासाठी स्नेहमेळाव्यांची गरज
02729
मजरे कारवे : स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक.
------------------------------------------
संवाद घडवण्यासाठी स्नेहमेळाव्यांची गरज
प्रा.परसू गावडे; फुले विद्यालयात २०००च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० : मोबाईलच्या युगात संवाद हरवला आहे. तो पुन्हा निर्माण करण्यासाठी स्नेहमेळाव्यांची गरज आहे, असे मत बेळगाव येथील आरपीडी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. परसू गावडे यांनी व्यक्त केले.
मजरे कारवे ( ता. चंदगड ) येथील महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित २००० सालच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे होते.
एम. एस. कोले म्हणाले, ‘विद्यार्थी आणि शिक्षक हे अतूट नाते आहे. विद्यार्थी दशेत चांगले संस्कार व्हावेत म्हणून काही वेळेला शिक्षकांनी कडक भूमिका घेतलेली असते.’ जी. पी. वरपे म्हणाले, ‘शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना केंद्रंबिंदू मानून काम करणारे शिक्षक स्मरणात राहतात.’ एस. जे. मोहनगेकर यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य गावडे यांनी विद्या संकुलाचा आढावा घेऊन गुरूपेक्षा विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत असल्याचे समाधान व्यक्त केले. जोतिबा गुरव, तानाजी कागणकर, शिवाजी पाटील, वैजनाथ मन्नोळकर, विकास टक्केकर, पुंडलिक डसके, एम. के. पाटील, राम कागणकर, उमेश पाटील, सुजाता पाटील, सुरेखा गिरीबुवा यांनी परिश्रम घेतले. राजेश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पाटील यांनी स्वागत केले. सुलोचना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. निंगाप्पा बोकडे यांनी आभार मानले.