विकासासाठी संघटनेचा उपयोग करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासासाठी संघटनेचा उपयोग करा
विकासासाठी संघटनेचा उपयोग करा

विकासासाठी संघटनेचा उपयोग करा

sakal_logo
By

02733
हलकर्णी ः माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात गोपाळराव पाटील यांच्यासह शिक्षकांचा सत्कार केला.
--------------------------------------------------------------------------------
विकासासाठी संघटनेचा उपयोग करा
गोपाळराव पाटील; हलकर्णी महाविद्यालय माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ ः एकेकाळी विद्यार्थी म्हणून एकाच वर्गात शिकणारे तरुण पुढील काळात जबाबदार नागरीक होतात. त्याचवेळी मागील स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने पुन्हा एकत्र येतात ही बाब खूप चांगली आहे. या संघटीतपणाचा उपयोग वैयक्तीक तसेच सामाजिक विकासासाठी करा, असे मत दौलत विश्वस्थ संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ट महाविद्यालयाच्या २००४ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
गोपाळराव पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांच्यासह त्यावेळचे शिक्षक प्रा. ए. बी. मगदूम, प्रा. एच. के. गावडे, प्रा. आर. बी. गावडे, प्रा. व्ही. व्ही. पाटील, प्रा. एस. एम. शहापूरकर, प्रा. एन. के. जावीर, प्रा. ए. व्ही. नौकुडकर यांचा सत्कार केला. बबन साबळे यांनी चार्टर्ड अकौंटंट, सटुप्पा पेडणेकर यांनी एमबीए, परशराम पाटील यांनी सीडब्ल्यूए तसेच पोलिस दलात उत्तम कामगिरी केल्याबद्दल रणजित देसाई यांचा सत्कार झाला. प्रवीण कांबळे, संदीप पेडणेकर, संतोष मोरे, सुवर्णा सुभेदार, पद्मा कडूकर, श्रध्दा कोकीतकर, प्रिया सुतार, मंजुळा वर्पे यांनी मनोगतातून गतस्मृतींना उजाळा दिला. यापुढील काळातही एकमेकांच्या सुख-दुःखात एकत्र येण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयाला छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली. दुपारच्या सत्रात मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. जोतिबा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. करुणा देसाई, आशा पाटील, विद्या सुतार, साधना केसरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तैसिन मुल्ला यांनी आभार मानले.