शिक्षण प्रबोधन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण प्रबोधन कार्यक्रम
शिक्षण प्रबोधन कार्यक्रम

शिक्षण प्रबोधन कार्यक्रम

sakal_logo
By

फोटो chd101.jpg
02746
मजरे कार्वे ः शिक्षण प्रबोधन व सत्कार कार्यक्रमात बोलताना बी. डी. पाटील, शेजारी इतर मान्यवर.
--------------------------------
शिक्षणक्षेत्र स्फटिकासारखे हवे
बी. डी. पाटील; मजरे कारवेत शिक्षण प्रबोधन शिबिर

चंदगड, ता. १० : शिक्षण क्षेत्र स्फटिकासारखे पवित्र राखायला हवे. ज्या शाळेत अध्यापन करतो तिथे येणाऱ्या मुलांचे भवितव्य घडवणे ही माझी जबाबदारी आहे; अशी भावना मनात ठेवून काम करायला हवे; असे मत शिक्षक संघटना फेडरेशनचे राज्य समन्वयक बी. डी. पाटील यांनी व्यक्त  केले. मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे शिक्षण प्रबोधन शिबिर व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे हे होते.
सुभाष बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. आर. डी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बी. डी. पाटील म्हणाले, ‘नोकरी करत असताना लाचारी पत्करू नका. तुमच्या हातून घडणारी पिढी देशाचे भवितव्य घडवेल. यासाठी तुम्ही तुमच्यातील शिक्षक जागा करा.’ जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष बी. एल. नाईक, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बी. एस. खामकर, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेश खोत यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल  ॲड बी. डी. मनोळकर ,ॲड. डी. एन. पाटील, गणेश निळ, ए. एस. पाटील, रवींद्र देसाई, दीपा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. एम. एम. तुपारे, दीपा पाटील, एस. डी. पाटील, संजय तुपारे, बी. बी. नाईक, ई. एल पाटील, एस.आर. पाटील, जी. पी. वरपे, पी. व्ही. ढेरे, राजू भोगण, प्रकाश बोकडे, नाना निर्मळकर, व्ही. बी. व्हन्याळकर, आर. एस. बोरगावकर, गुलाब पाटील, महादेव भोगुलकर, पांडूरंग मोहनगेकर, अजित गणाचारी, आण्णापा चिंचणगी, कुंदन पाटील व जिल्हयातील सर्व तालुक्यांतील संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पी. एम. ओऊळकर यांनी आभार मानले.