हलकर्णी महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलकर्णी महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा
हलकर्णी महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा

हलकर्णी महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा

sakal_logo
By

हलकर्णी महाविद्यालयात
तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा
चंदगड, ता. ११ ः शिक्षणातून माणसाच्या अंगी शहाणपण येते. योग्य अयोग्य काय याची जाणीव निर्माण होते. त्याचा उपयोग करुन काळाशी सुसंगत निर्णय घ्यायला शिका, अशी सुचना दौलत विश्वस्थ संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केली.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. अजळकर म्हणाले, ‘पदवीनंतर नवीन आयुष्याला सुरवात होते. शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करुन उत्तम करीअर घडवा. प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम करा.’ डॉ. राजेश घोरपडे, प्रा. के. एम. गोनुगडे यांच्यासह रणजित होनगेकर, महेश सांबरेकर, माधुरी सुतार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. व्ही. व्ही कोलकार, डॉ. आय. आर. जरळी, प्रा. ए. एस. बागवान, डॉ. अनिल गवळी, प्रा. ए. एस. जाधव, डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. जी. जे. गावडे, प्रा. एस. डी. तावदारे, प्रा. एस. एन. खरुजकर, प्रा. एम. एन. पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. एस. एन. पाटील उपस्थित होते. डॉ. ए. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रास्ताविक केले. इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. यु. एस. पाटील यांनी आभार मानले.