चंदगडला काजू बीचे दर घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला काजू बीचे दर घसरले
चंदगडला काजू बीचे दर घसरले

चंदगडला काजू बीचे दर घसरले

sakal_logo
By

काजू बीचा संग्रहित फोटो वापरावा
----------
चंदगडला काजू बीचे दर घसरले
आठवडा बाजारात १५ ते २० रुपयांची तफावत; मोठ्या शेतकऱ्यांना फटका
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ : येथील आठवडा बाजारात काजू बीच्या दरामध्ये २० ते २५ रुपयांची घसरण झाली. पंधरा दिवसांपूर्वी १०० ते १२० रुपये दर होता. यावेळी मात्र तो ९५ ते १०० रुपयांवर आला.
तालुक्याच्या पश्चिम भागात चंदगड, इब्राहिमपूर, गवसे, कानुर, झांबरे, उमगाव, हेरे, पाटणे, जंगमहट्टी ते कर्नाटक सीमेवरील तुडीये, कोलीकपर्यंत काजूचे मोठे उत्पादन होते. शेताच्या बांधावर उत्पादित होणाऱ्या काजूमुळे शेतकऱ्याला चांगले आर्थिक चलन मिळते. या विभागात निर्माण झालेले काजू प्रक्रिया उद्योग आणि बीची वाढती मागणी यामुळे दरही चांगला मिळायला सुरुवात झाली. १२० ते १५० रुपयांपर्यंत दर पोहोचला होता. वाढती मागणी विचारात घेऊन शेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग लागवड योजनेतून माळरानावरही काजूच्या रोपांची लागवड केली. मात्र मधल्या काळात परदेशी काजूची आयात वाढली. त्यामुळे स्थानिक बीचा दर कमी झाला. सात वर्षांपूर्वी किलोचा दर अवघ्या ४६ रुपयांवर आला होता. यावर्षीही सुरुवातीच्या काळात १०० ते १२० रुपये दर होता. मात्र आता तो पुन्हा ९५ ते १०० रुपयांवर आला आहे. जास्त उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा फटका आहे.
-------------
काजू बीचा दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहे. हा दररोज बदलत असतो. एक महिन्यापूर्वीचा दर आणि आत्ताचा दर यामध्ये मोठी तफावत आहे. याचा फटका काजूप्रक्रिया उद्योजकांनाही बसला आहे.
- दयानंद काणेकर, काजू प्रक्रिया उद्योजक चंदगड