सोनारवाडीत गुरुवारपासून मंदिर जिर्णोध्दार सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनारवाडीत गुरुवारपासून 
मंदिर जिर्णोध्दार सोहळा
सोनारवाडीत गुरुवारपासून मंदिर जिर्णोध्दार सोहळा

सोनारवाडीत गुरुवारपासून मंदिर जिर्णोध्दार सोहळा

sakal_logo
By

सोनारवाडीत गुरुवारपासून
मंदिर जीर्णोद्धार सोहळा
चंदगड, ता. १४ ः सोनारवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री सातेरीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा गुरुवारपासून (ता. १८) सुरू होत आहे. रविवारी (ता. २१) त्याची सांगता होईल. गुरुवारी सकाळी मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. दहाला मूर्ती व कळस मिरवणूक होईल. सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत जागर दिंडी होईल. रात्री नऊनंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता. १९) मान्यवरांचा सत्कार तसेच सोंगी भजन होईल. शनिवारी (ता. २०) होमहवन व रात्री भारुडी भजन होईल. रविवारी (ता. २१) मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळसारोहण होईल. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जीर्णोद्धार समितीतर्फे करण्यात आले आहे.