भेंडुलकर कुटुंबियांचे चंदगडमध्ये उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेंडुलकर कुटुंबियांचे चंदगडमध्ये उपोषण
भेंडुलकर कुटुंबियांचे चंदगडमध्ये उपोषण

भेंडुलकर कुटुंबियांचे चंदगडमध्ये उपोषण

sakal_logo
By

02765
चंदगड : तहसील कार्यालयासमोर श्रीमती अनुसया भेंडुलकर व कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे.
---------------------------------------
भेंडुलकर कुटुंबीयांचे चंदगडमध्ये उपोषण
चंदगड, ता. १५ : हलकर्णी (ता. चंदगड) येथील अनुसया मारुती भेंडुलकर यांनी जमिनीचा बेकायदेशीररीत्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा, या मागणीसाठी कुटुंबीयांसह येथील तहसील कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पाटणे (ता. चंदगड) हे भेंडुलकर यांचे माहेर. त्यांना कन्या वारसाने एक एकर २० गुंठे जमीन वाटणीला आली. मात्र, मध्यस्थाने त्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर या जमिनीचा विक्री व्यवहार केल्याचा भांडवलकर यांचा आरोप आहे. चार वर्षांपूर्वी हा प्रकार घडला असून यासंदर्भात त्यांनी वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. प्रत्यक्ष भेटून माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्यांना न्याय दिलेला नाही. हा विक्री व्यवहार रद्द करावा, आपल्याला झालेली आर्थिक व मानसिक नुकसान भरपाई मिळावी, संबंधित संशयितांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घेऊन श्रीमती भेंडुलकर, त्यांचा मुलगा परशराम व सून प्रतिभा येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनासाठी बसले आहेत.