Sat, Sept 30, 2023

पोलीस दलात निवड
पोलीस दलात निवड
Published on : 15 May 2023, 3:29 am
02767
----
पोलिस कॉन्स्टेबलपदी
मानसी पाटकरची निवड
चंदगड : हेरे ( ता. चंदगड ) येथील मानसी हनुमंत पाटकर हिची पोलिस दलामध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाली. रत्नागिरी येथे झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये तिने यश संपादन केले. पोलिस दलात भरती झालेली गावातील ती पहिलीच महिला ठरली आहे. मानसीचे आई-वडील शेतमजुरी करतात. त्यांना तीन मुलीच आहेत. मात्र अत्यंत कष्टाने त्यांनी सर्वच मुलींना उच्चशिक्षित केले. घरची परिस्थिती विचारात घेऊन मानसीने पोलिस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतःच मैदानावर सराव केला आणि त्यातून तिने हे यश संपादन केले.