
मालकीतून रस्त्याची तक्रार
हल्लारवाडीत मालकी जमिनीतून रस्ता केल्याची तक्रार
चंदगड : हल्लारवाडी ( ता. चंदगड ) येथील ग्रामपंचायतीने संमती न घेता मालकी हद्दीतून रस्ता काढला असल्याची तक्रार संबंधित शेतकरी पांडुरंग गुंडू सदावर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. सदावर यांचे हल्लारवाडी गावच्या हद्दीमध्ये वडिलोपार्जित शेत आहे. त्यामध्ये ते विविध पिकांचे उत्पादन घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मात्र ग्रामपंचायतीने कोणताही शासकीय आदेश नसताना व सदावर यांना विश्वासात न घेता बळजबरीने त्यांच्या ऊस पिकाचे नुकसान करून रस्ता केला आहे. जॅकवेलकडे जाण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी स्थळ पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी सदावर यांनी केली आहे. याबाबत सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.