
चंदगड तहसीलवर मोर्चा
02791
चंदगड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
----
वंचित बहुजन आघाडीचा
चंदगड तहसीलवर मोर्चा
काजूला हमीभाव द्याः उसाची थकीत एफआरपी त्वरित जमा करा
चंदगड, ता. २२ : काजू बी ला हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसह तालुक्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज चंदगड तालुका बहुजन आघाडीच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार हेमंत कामत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
जुन्या बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठ, रवळनाथ मंदिर मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर आला. मोर्चासमोर बोलताना प्रा. ए. डी. कांबळे म्हणाले, ‘चंदगड तालुक्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र व्यापारी आणि दलाल वर्गाकडून काजूला योग्य दर दिला जात नाही. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे.’ प्रा. व्ही. एस. कार्वेकर म्हणाले, ‘सर्वाधिक उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग असताना काजू बोर्डाचे कार्यालय कोकणात नेले आहे. हा चंदगड विभागावर अन्याय आहे.’ प्रा. एन. एस. पाटील म्हणाले, ‘बारा वर्षांपूर्वी दौलत कारखान्याकडून शेतकऱ्यांची एफआरपीची उर्वरित रक्कम थकीत आहे. जप्त केलेल्या साखरेचे सर्व पैसे पतसंस्थांना दिल्यामुळे शेतकरी हक्काच्या पैशापासून वंचित आहेत.’ मोर्चात आर. पी. कांबळे, एल. डी. कांबळे, डी. के. कदम, रामजी कांबळे, रणजीत देसाई, कृष्णा रेगडे, भेबा कांबळे आदी सहभागी झाले.