चंदगडचा ९२.५३ टक्के निकाल

चंदगडचा ९२.५३ टक्के निकाल

चंदगडचा ९२.५३ टक्के निकाल
चंदगड, ता. २५ ः तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९२.५३ टक्के लागला. २ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. त्यापैकी २ हजार २१७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. २ हजार १०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५२ विद्यार्थी डिस्टीक्शंनमध्ये, २८४ विद्यार्थी ग्रेड ए, १ हजार २९४ विद्यार्थी ग्रेड २ तर ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाविद्यालय व त्यांच्या शाखानिहाय निकालाची टक्केवारी अशी ः श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री- कला ७७.७७, विज्ञान १००, वाघमारे ज्युनिअर कॉलेज ढोलगरवाडी- कला ७०.५८, धनंजय विद्यालय नागनवाडी- कला, वाणिज्य व विज्ञान शाखा १००, बागीलगे डुक्करवाडी विद्यालय- कला ६४.७०, वाणिज्य १००, श्री छत्रपती शहाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पाटणे - कला ७३.९१, श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अडकूर- कला ८८.२३, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज माणगाव- कला १००, श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चंदगड- कला ९२.८५, वाणिज्य १००, श्री सिध्देश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुदनूर - कला ८८.८८, राजश्री शाहू ज्युनिअर कॉलेज शिनोळी बुद्रूक- विज्ञान ६६.६६, श्री सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हेरे- विज्ञान १००, वाणिज्य ९६.८७.
आज निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आनंदोत्सव साजरा केला. समाजमाध्यमावरुन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे संदेश फिरु लागले. टक्केवारीनुसार पुढील दिशा कोणती निवडायची याची चर्चा विद्यार्थी, पालकांत सुरु झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com