
पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याची मागणी
02800
चंदगड ः बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना अजित देसाई, सरपंच सचिन गुरव आदी.
----------------------------------------------------------------
पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याची मागणी
चंदगड ः अडकूर (ता. चंदगड) बस थांब्यापासून ओढ्यापर्यंतचा रस्ता व गटारीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. अडकूर हे बाजारपेठेचे गाव आहे. परीसरातील दहा- पंधरा खेड्यातील नागरीक येथे येत असतात. चंदगड- गडहिंग्लज मार्गावरील ते महत्वाचे केंद्र असल्याने गर्दी असते. मात्र गावाला लागूनच असलेला रस्ता व गटरचे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे अशी मागणी अजित देसाई, सरपंच सचिन गुरव, सदस्य शिवराज देसाई, सागर इंगवले, अभिजित देसाई यांनी केली आहे.