गव्यांकडून उसाचे नुकसान

गव्यांकडून उसाचे नुकसान

02820
भोगोली ः रमेश चौगुले यांच्या शेतात गव्यांनी केलेले ऊस पिकाचे नुकसान.
----

भोगोली परिसरात गव्यांच्या
कळपाकडून उसाचे नुकसान

चंदगड, ता. ३१ ः भोगोली (ता. चंदगड) येथे गव्यांच्या कळपाने सुमारे दोन एकरांतील ऊस पिकाचे नुकसान केले आहे. सातत्याने गवे या शेतात नुकसान करीत असल्याने उसाची वाढच खुंटली आहे. पिकासाठी केलेला खर्च विचारात घेता उत्पन्न किती मिळणार याबाबत शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
भोगोली, रायाचीवाडी, काळगोंडवाडी, कानूर, पुंद्रा, कुरणी हा परीसर कोकण सीमेला लागून आहे. घनदाट जंगलाच्या कुशीत शिवार असल्यामुळे गव्यांकडून या परिसरातील शेतीला नेहमीचा त्रास आहे. शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करुनही गवे त्याला दाद देत नाहीत. कळपाने येणारे गवे पिकाची नवीन पालवी देठापर्यंत खाऊन फस्त करतात. नवीन पालवी आली की पुन्हा ती खाल्ली जाते. त्यामुळे पिकाची वाढच खुंटली आहे. काल रात्री रमेश चौगुले, सुभाष चौगुले यांच्यासह शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे त्यांनी नुकसान केले. वन विभागाकडून मिळणारी भरपाई तोकडी असल्याने आणि त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना दमछाक होत असल्याने शेतकरी शासकीय मदतीबाबत नाराज आहेत. वन्य प्राण्यांचा सततचा त्रास असल्याने शेती कसायची की नाही असा त्यांचा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com