
सतरा विद्यार्थ्यांची निवड
‘माडखोलकर’च्या सतरा विद्यार्थ्यांची निवड
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील सतरा विद्यार्थ्यांची आयसीआयसीआय बॅंकेच्या रिलेशनशिप मॅनेजरपदी निवड झाली. कॅम्पस इंटरव्हूच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाल्याचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व करिअर गाईडन्स व प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. आर. एन. साळुंके यांनी सांगितले. सर्व शाखेतील पदवीधर तरुणांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू होता. बारावीच्या परीक्षेत पन्नास टक्केहून अधिक गुण आवश्यक होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुलाखती घेतल्या. त्यातून सतरा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यांना वार्षिक दोन लाख ७० हजार ते तीन लाख २५ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळेल. भविष्यातही चांगल्या करीअरची त्यांना संधी आहे. महाविद्यालयात गेल्या काही वर्षापासून विविध कंपनींकडून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हुशार, होतकरु विद्यार्थ्यांना दर्जेदार कंपनीतून नोकरीची संधी प्राप्त होत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करुन आपले भविष्य घडवायला हवे, असे मत प्राचार्य डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.